Home सामाजिक भारतिय बौध्द महासभेची तालुका कार्यकारिणी गठित

भारतिय बौध्द महासभेची तालुका कार्यकारिणी गठित

1324

तालुकाध्यक्षपदी श्याम रामटेके तर सचिवपदी अमृत शेंडे

नागभीड : बौध्द धम्माचा प्रचार आणी प्रसार व्हावा. धम्माचे मार्गाने चालण्यासाठी बौद्धांची मातृसंस्था असलेली भारतीय बौध्द महासभा देशभरात कार्य करत असुन राज्यभर बौध्द महासभेच्या कार्यकारीणी गठित करण्यात येत आहेत.
दरम्यान भारतीय बौध्द महासभेचे चंद्रपूर पुर्व जिल्हाध्यक्ष डॉ.राजपाल खोब्रागडे यांचें नेतृत्वात आंनद बुध्द विहार नागभिड येथे भारतीय बौध्द महासभेच्या विविध विभागांचे कार्यकारिणीचे गठण करण्यांत आले असुन तालुकाध्यक्षपदी श्याम रामटेके, सरचिटणीस अमृत शेंडे, कोषाध्यक्ष रामकृष्ण रामटेके यांची निवड करण्यात आली.

.     बौध्द महासभेच्या विविध विभागांचे कार्यकारणीमधे संस्कार उपाध्यक्ष अमर शेंडे, पर्यटन उपाध्यक्ष आनंद मेश्राम, स्वंरक्षण उपाध्यक्ष राहुल रामटेके, तपासणीस ज्ञानेश्वर डांगे, कार्यालयीन सचिव अरविंद घायवान, संस्कार सचिव दिवाकर बनकर, स्वंरक्षण सचिव रमेश बागडे, पर्यटन प्रचार सचिव भास्कर सागोडकर, पर्यटन प्रभारी दिवाकर मुलमुले, संरक्षण सचिव मिलिंद खोब्रागडे, प्रकाश वाकडे, संघटक मनोहर रामटेके, राजकुमार मेश्राम, निमराज मेश्राम, अशोक रामटेके, केशव मेश्राम, हिराचंद बारसागडे, वामन रामटेके, नागभिड शहराध्यक्ष चंदन कोसो, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

.     यावेळी भारतीय बौध्द महासभेचे चंद्रपूर पुर्व जिल्हाध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे, जिल्हा कार्यकारिणीचे लोमेश खोब्रागडे, घनश्याम भडके, अशोक रामटेके, अनिल मेश्राम, मंगल कोसे, मोहन नंदेश्वर, जिल्हा महिला अध्यक्षा विजया रामटेके, उषा दुर्गे, सरला रंगारी, आदी जिल्हा पदाधिकारी तथा तालुक्यातील उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!