Home सामाजिक नागभीड पोलीस ठाण्याचा पदभार ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी स्वीकारला 

नागभीड पोलीस ठाण्याचा पदभार ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी स्वीकारला

1408

नागभीड : अगदी काही महिन्यापूर्वी नागभीड पोलीस स्टेशन चा पदभार ठाणेदार अमोल काचोरे  यांनी स्वीकारला होता. मात्र त्यांची अल्पावधीतच भद्रावती पोलीस ठाण्याला बदली झाली. त्यांच्या जागी  पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली. कोकाटे यांनी नागभीड पोलीस ठाण्याचा पदभार  स्वीकारला.

.      नागभीड पोलीस स्टेशन येथील तत्कालीन ठाणेदार अमोल काचोरे यांची भद्रावती येथें बदली झाल्याने त्यांचे ठिकाणी नवीन ठाणेदार म्हणून रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले. कोकाटे हे यापूर्वी लाखांदूर, साकोली येथें कार्यरत होते. ते रुजू होताच पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!