विनोद शर्मा यांची प्रशासनाकडे मागणी
चिमूर : येथील तालुका मुख्यालयातील असलेले क्रीडा संकुल मागील काही महिन्यांपासून कचऱ्याच्या विळख्यात असून याचा त्रास मैदानावर विविध खेळाचा सराव करणाऱ्या क्रीडापटूंना होत आहे.तरी तालुका क्रीडा संकुल त्वरित स्वच्छ करण्याची मागणी प्रशासनाकडे चिमूर क्रांती संघटनेचे विनोद शर्मा यांनी निवेदनातून केली आहे.
. चिमूर तालुक्याच्या मुख्यालयी असलेले एकमेव क्रीडा संकुलात शहरातील तसेच तालुक्याच्या विविध गावातील क्रीडापटू सरावासाठी येत असतात.मागील काही दिवसांपासून या मैदानावर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला असून.या मुळे या ठिकाणी विषारी साप, विंचू निघत असल्याने भितिजण्य वातावरणात सराव करावा लागतं आहे.विषारी प्राण्याच्या दंशाने जीवितहानी ची शक्यता नाकारता येत नाही.
. कोणतीही दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने या कडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन मैदान कचरा मुक्त करण्यात यावे. अशी मागणी चिमूर क्रांती संघटनेचे विनोद शर्मा यांनी निवेदनातून तहसीलदार यांचे कडे केली आहे.


