Home चंद्रपुर जिल्हा विशेष आरोग्य केंद्रात आरोग्यसेविकेचे बेकायदेशीर वास्तव्य

आरोग्य केंद्रात आरोग्यसेविकेचे बेकायदेशीर वास्तव्य

1332

सेवानिवृत्त होऊनही तब्बल 11वर्षापासून आरोग्य केंद्रातच

लोहारा ग्रामपंचायत तथा ग्रामस्थांची मागणी

अनेक अर्ज तक्रारी करूनही आरोग्य विभाग झोपेत

नेरी : नेरीवरून जवळ असलेल्या लोहारा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मागील 11 वर्षांपासून आरोग्य सेविका सेवानिवृत्त झाल्या आहेत. परंतु त्यांनी अजूनही मुख्यालय सोडले नसून आताही वास्तव्यास आहेत. याबाबत अनेकदा आरोग्य विभाग, पोलीस विभाग, पंचायत समिती याना अर्ज निवेदन व माहिती देऊनही कुठलीही कारवाई झाली नाही. सदर सेवानिवृत्त आरोग्य सेविकेमुळे या ठिकाणी नवीन आरोग्य सेविका तसेच डाकटर सुद्धा यायला तयार नाही. त्यामुळे गावाची संपुर्ण आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे. रुग्ण आल्यापावली परत जात आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेत असून गोरगरीब जनतेला आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे त्या सेवानिवृत्त आरोग्य सेविकेला हाकलून लावावे अशी मागणी ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांनी केली आहे.

.      लोहारा हे मोठे गाव असून या गावात आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात बोळधा लावारी लोहारा हेटी ही चार गावे समाविष्ट आहेत. मागील अकरा वर्षांपासून दुर्सलवार नावाची आरोग्य सेविका सेवानिवृत्त झाली असून सुद्धा त्यांनी मुख्यालय सोडले नसून त्या तिथेच वास्तव्याला आहेत. त्यामुळे नवीन आरोग्य सेविका तसेच आरोग्य अधिकारी यायला तयार नसल्याने संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडली आहे. मात्र अजुनपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आरोग्य विभाग झोपेत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सदर सेविकेच्या वास्तव्याने नवीन येणाऱ्या सेविकांनाआरोग्य सेवा देने कठीण झाले आहे. कारण नवीन सेविकेला उपचार करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे संपूर्ण गावाची तसेच इतर तीन गावाची आरोग्य कोलमोडले असुन उपचार कुठे घ्यावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा संबंधित विभागाने तात्काळ या गंभीर प्रश्नांची दखल घेऊन आरोग्य सेविकेची हकालपट्टी करावी त्यांना मुख्यालयातून बाहेर काढून पुर्वरत सेवा सुरू करावी अशी मागनी ग्रामपंचायत लोहारा तसेच गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन झेडण्याचा गावकऱ्यांनी इशारा दिला आहे.

error: Content is protected !!