वरोरा
उपजिल्हा रुग्णालय वरोरा च्या रुग्णकल्याण समितीमध्ये सुभाष दांदडे यांची खासदार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मागील 10 वर्षांपासून आमदार प्रतीनिधी म्हणून कार्यरत असलेले सुभाष दांदडे यांची खासदार प्रतिनिधी म्हणून पुन्हा फेर निवड करण्यात आली. दांदडे हे अगदी मनमिळाऊ स्वभावाचे धनी असून त्यांच्या प्रयत्नातून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात ईसीजी, सोनोग्राफी, एक्सरे, सारख्या मशीन उपलब्ध झाल्या. डिलिव्हरी च्या रुग्णांना रेफर टू चंद्रपूर अशी परंपरा होती मात्र सुभाष दांदडे यांनी ती मोडकळीस आणून वरोरा उपजिल्हा रुग्णालयातच सीझर ची व्यवस्था केली. तज्ञ डॉक्टर उपलब्ध असून सर्व आजारावर आता इथेच उपचार केले जातात. तत्कालीन आमदार बाळू धानोरकर यांनी सुभाष दांदडे यांच्या रुग्णसेवेच्या कार्याची दखल घेत त्यांना आमदार प्रतिनिधी म्हणून काम सोपविले त्यात खरे उतरत पुन्हा तत्कालीन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यकाळात सुद्धा 5 वर्ष आमदार प्रतिनिधी म्हणून ते काम पाहत असून पुन्हा त्यांची खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या शिफारशीनुसार उपजिल्हा रुग्णालय, वरोरा, येथील रुग्णकल्याण समितीमध्ये खासदार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्याअनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय, वरोरा, जि. चंद्रपूर येथील रुग्णकल्याण समितीमध्ये . खासदार प्रतिनिधी म्हणून सुभाष उर्फ प्रदिप दांदडे यांचे नाव अंतर्भूत करण्याबाबत तसेच तदअनुषांगीक प्रचलित नियमानुसार इतर कार्यवाही करण्यात यावी. असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ. महादेव चिंचोळे, सामान्य रुग्णालय, चंद्रपुर यांनी वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा यांना देण्यात आले.


