Home चंद्रपुर जिल्हा विशेष बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षीय बालक ठार

बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षीय बालक ठार

1308

दुर्गापूर परिक्षेत्रातील मसाळा येथील घटना

चंद्रपूर : घराच्या मागील बाजूस शौचास गेलेल्या 7 वर्षीय बालकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घेत त्याला उचलून नेल्याची घटना – दुर्गापुर परिक्षेत्रातील मसाळा गावात (दि.20 सप्टेंबर) शुक्रवारला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली.  भावेश तुराणकर (7) असे मृतक बालकाचे नाव आहे.

.       प्राप्त माहिती नुसार भावेश हा 7 वर्षीय बालक आपल्या घरच्या मागे शौच करण्यासाठी गेला. मात्र बराच वेळ होऊनही भावेश घरी  परत आला नाही. त्यामुळे भावेशच्या आई- वडिलांनी त्याचा शोध घेतला, त्यानंतर काहींना परिसरात बिबट दिसला अशी माहिती दिली असता याबाबत वनविभाग व दुर्गापूर पोलिसांना माहिती देण्यात आली.

.       ही माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे ह्या मसाळा गावात दाखल झाल्या, पोलीस व गावकऱ्यांनी रात्रभर शोधमोहीम राबवली मात्र भावेश कुठेही आढळून आला नाही. शनिवारी सकाळी तुराणकर यांच्या घरापासून 300 मीटर अंतरावरील पद्मापुर सब एरिया कार्यालय जवळील झाडावर काहींना बिबट बसलेल्या अवस्थेत दिसला. पोलीस व वनविभागाची चमू ने झाडाखाली शोध घेतला असता तिथे भावेशचा छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. अत्यंत क्रूर पध्दतीने भावेश ला बिबट्याने खाल्ले होते. यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांनी जमाव केला, भावेश चा मृतदेह बघताच कुटुंबाने टाहो फोडला, नागरिक क्रोधीत झाले, तणावाची स्थिती निर्माण झाली, पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांनी परिस्थिती हाताळत भावेश चा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठविला. मृतक भावेश हा पहिल्या वर्गात शिकत होता, भावेश च्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

.       दुर्गापूर, सीएसटीपीएस ला ताडोबा जंगलाचा भाग लागून आहे, अनेकदा त्याठिकाणी वाघ, बिबट व अस्वलांचा वावर आढळून आला आहे, मागील 3 वर्षात फक्त दुर्गापूर भागात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जवळपास 15 नागरिकांचा मृत्यू झाला, मानव वन्यजीव संघर्षांच्या घटनेत वाढ होत असताना वनविभागाने या घटनांवर आळा बसविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज होती मात्र इतक्या वर्षात कसलीही उपाययोजना वनविभागाने केली नसल्याने आज पुन्हा अशी दुर्दैवी घटना उघडकीस आली.

.       या परिसरात वेकोली कार्यालय आहे, त्याचठिकानी वेकोलीचा कचरा टाकल्या जातो, म्हणून त्याठिकाणी डुक्कराचा वावर वाढला, शिकारीच्या शोधात असलेल्या वन्य प्राण्यांना या भागात अलगद शिकार उपलब्ध होते, त्यामुळे मसाळा भागात वन्यप्राणी येऊ लागले अशी सर्वत्र चर्चा आहे.

error: Content is protected !!