Home चंद्रपुर जिल्हा विशेष 8 वर्षांपासून शेतकऱ्यांची वाट चिखलातूनच

8 वर्षांपासून शेतकऱ्यांची वाट चिखलातूनच

1383

वासेरा येथील पांदन रस्त्याचे काम थंड्याबस्त्यात

सिंदेवाही : राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावेत, या दृष्टीकोनातून “मी समृद्ध, तर गाव समृद्ध. आणि गाव समृध्द, तर माझा महाराष्ट्र समृद्ध. ही संकल्पना घेऊन राज्य शासन महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजने मार्फत मातोश्री पांदन रस्ता ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र मागील ८ वर्षापासून वासेरा येथील बसस्टँड ते नदिघाट हा पांदन रस्ता शासनाच्या फायली मध्ये अडकल्याने अजूनही येथील शेतकऱ्यांची वाट चिखलातून काढावी लागत आहे.

.       सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वासेरा येथे मागील ८ वर्षापूर्वी ग्राम पंचायत अंतर्गत बसस्टँड ते नदिघाट या पांदन रस्त्याचे मातीकाम करण्यात आले. त्यानंतर काही वर्षांनी अर्ध्या रस्त्यावर दगड टाकण्यात आले. मात्र त्यानंतर त्या पांदन रस्त्याचे खडीकरण करण्यात आले नसल्याने रस्त्यावर पूर्णतः चिखल पसरलेला आहे. आणि मागील ८ वर्षापासून त्याच चिखलामधून शेतकऱ्यांना वाट काढून शेतीवर जावे लागत आहे. ग्राम पंचायत कडून सदर पांदन रस्त्याचे काम करण्यासाठी दोन ते तीनदा कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र सदर पांदन रस्त्यावर पाईप टाकले असल्याचे ऑनलाईन दाखविण्यात येते. आणि त्या पाईप चे शासनाने संबंधित कंत्राटदारांना पैसे दिले नसल्याने न्यायालयीन प्रक्रिया मध्ये रस्ता असल्याचे संबंधित कार्यालयाकडून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात सदर रस्त्यावर कोणतेही पाईप टाकण्यात आलेले नाही. याबाबत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालय पंचायत समिती सिंदेवाही चे तांत्रिक सहाय्यक यांनी स्वतः प्रत्यक्षात येऊन पांदन रस्त्याची पाहणी करून गेले. मात्र त्या नंतरही सदर पांदन रस्त्याचे काम करण्यास महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालय नकार देत असून ज्या पांदन रस्त्यावर कोणतेही पाईप टाकले नसताना त्या रस्त्यावर पाईप टाकले आहेत. असा बनावट अहवाल संबधित कंत्राटदाराने केला असल्याने तालुका व जिल्हा प्रशासनाचा याबाबत किती निष्काळजीपणा आहे. हे यावरून दिसून येते.

.       सिंदेवाही पंचायत समितीच्या मार्फत तालुक्यात मातोश्री पांदन रस्त्याचे काम जोरात सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी मागील ८ वर्षापासून वासेरा येथील शेतकऱ्यांना शेतीच्या दिवसांत चिखलातून वाट काढून जावे लागत असल्याने येथील शेतकऱ्यांनी प्रशासानाबाबत संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अनेक कामात गैर प्रकार झाले असून त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वासेरा बसस्टँड चौक ते नदिघाट पर्यंतचा पांदन रस्त्यावर कुठेही पाईप टाकल्याचे आढळत नाही. मात्र संबधित कंत्राटदाराने सदर रस्त्यावर पाईप टाकल्याचा दावा केला असताना सिंदेवाही येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालय एवढा अनभिज्ञ कसा ? असा प्रश्न उपस्थित करून सदर पांदन रस्त्याचे त्वरित खडीकरण करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

error: Content is protected !!