निर्लेखित शाळेत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन
भिसी : चिमुर तालूक्यातिल कोटगांव व पुयारदंड येथील जिल्हा परिषद च्या शाळांच्या इमारती जिर्ण झाल्या असुन प्रशासनाने त्या निर्लेखित केल्या आहेत तर काही शाळा बांधकामाला भ्रष्ट्राचाराची किड लागुन त्यांना गळती सुरु झाल्याने स्लॅब चे प्लास्टर खाली पडत आहे. अशा परीस्थीतीत शिक्षक व विद्यार्थी आपला जिव धोक्यात घालून विज्ञार्जन करीत आहेत.
. चिमुर तालूक्यातील कोटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत निर्लेखित झाली असून त्याच इमारतीत शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. इयत्ता पाचवीपर्यंत वर्ग असून विद्यार्थ्यांची पटसंख्या ३१ आहे. त्यामध्ये मुलं १६ आणि मुली १५ आहेत. शाळेच्या दोन इमारती असून एका इमारतीचे स्लॅब गळत असल्याने येथील सर्व विद्यार्थी हे एकाच इमारतीच्या खोलीमध्ये बसत असून ती सुद्धा एका बाजूने झुकल्याने गळत आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असलेल्या प्राथमिक शाळेची या काळात दैना अवस्था झाली आहे. येथील शिक्षक आपला जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून, विद्यार्थीसुद्धा आपल्या जीवाची परवा न करता शिक्षण घेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य पाहता कुठलीही जीवितहानी होण्याअगोदर येथील नवीन शाळेच्या इमारतीला मंजुरी द्यावी, अशी मागणी कोटगांव च्या नागरिकांनी केली आहे. त्याच प्रमाने जिर्ण ईमारत तोडून नविन इमारतीला मंजुरी द्या अशी मागणी पुयारदंड चे उपसरपंच सुनील नैताम यांनी केली आहे.
. चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या इमारती फार जुन्या असून जिर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या जिर्ण इमारती पासुन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तरी या गंभिर बाबीची प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन नविन इमारत मंजूर करावी अशी मागणी ग्राम पंचायत उपसरपंच सुनिल नैताम यांनी केली आहे. पुयारदंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकुण पटसंख्या 54 आहे. त्यामध्ये मुलं 33 आणि मुली 21 आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जिव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या दोन इमारती असून एका इमारतीची स्लॅप गळत असल्याने ती पळण्याच्या स्थीतीत आहे. येथील सर्व विद्यार्थी हे बसण्यायोग्य असलेल्या एकाच इमारतीच्या खोलीमध्ये बसत असून ती सुद्धा एका बाजूने दबली जात आहे व पावसाचे पाणी गळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या इमारतीमुळे धोका निर्माण झाला आहे. या शाळेत चार शिक्षक आपला जिवमुठित घेऊन विद्याथ्यर्थ्यांना शिक्षण देत असून विद्यार्थी सुद्धा आपल्या जीवाची परवा न करता शिक्षण घेत क्षण घेत आहेत त्यामुळे प्रशासनाने या परिस्थितीचे गांभीर्य पाहता कुठलीही जीवित हाणी होऊ नये. होण्याअगोदर पुयारदंड येथील नवीन शाळेच्या इमारतीला मंजुरी द्यावी अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी केली आहे.
कोटगांव जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकांचे सरपंचाला पत्र शाळेच्या इमारती निर्लेखित झाल्या असून अशा इमारतीत विद्यार्थ्यांना बसवू नये. असे शासनाचे निर्देश असल्याने गावात शिक्षणासाठी एखादी खोली देण्याची मागणी मुख्याध्यापकांनी पत्राद्वारे सरपंचांकडे केली आहे.


