बामनडोह नाल्याचे पाणी शेतकर्यांच्या शेतात
वरोरा : तालुक्यातील आसाळा गावात बामनडोह नाला आहे या नाल्यावर पाइप टाकून जाण्या येण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. मात्र दरवर्षी या नाल्यात पावसाळ्यात कचरा लटकतात आणि पाणी अडून थेट शेतकर्यांच्या शेतात जातात. दरवर्षी लाखो रुपयाचे नुकसान होतात आणि शासन शेतकर्यांना तुटपुंजी मदत देत शेतकर्यांच्या जखमेवर तेल ओततात. त्यामुळे आम्हाला शासनाची मदत नको आम्हाला बामनडोह नाल्यावर कॉलम चा पूल द्या अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
. आसाळा या गावामधून बामनडोह नाला वाहत असून या नाला ओलांडून पिजदुरा, पाचगाव (ठा) या गावाला जाणारे रस्ते आहे सदर नाल्यावर पाईप टाकून पूल बांधले मात्र या पुलाला पाण्याने वाहून आलेला कचरा लटकतात त्यामुळे पाईप पूर्ण बंद पडून ते पाणी नाल्यालगत असलेल्या शेतकर्यांच्या शेतात जाऊन लाखो रुपयाचे नुकसान होत असते त्यामुळे हा पूल पाईप ऐवजी कॉलमचा बांधण्यात यावा या साठी शेतकर्यांनी निवेदन दिले मात्र प्रशासन या विषयी गंभीर नसल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. पुरामुळे झालेले नुकसानीचे शासनमार्फत पंचेनामे होतात मात्र ती मदत तुटपुंजी असते. ती मदत नको ते पूल तोडून कालमचे बांधून देण्यात यावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.


