तालुका पत्रकार संघाने पुष्पगुच्छ देऊन घेतली सदिच्छा भेट
सिंदेवाही : मागील दीड दोन वर्षापासून कार्यरत असलेले सिंदेवाहींचे तत्कालीन गट विकास अधिकारी अक्षय सुक्रे यांची नुकतीच परभणी जिल्ह्यात बदली झाली असल्याने त्यांना सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयातून पदमुक्त करण्यात आले. त्यांचे ठिकाणी ग्राम सेवक ट्रेनिंग सेंटरचे व्याख्याते प्रदीप पांढरबळे यांचेकडे सिंदेवाही गट विकास अधिकारी म्हणून प्रभार देण्यात आला. व नुकतेच कार्यालयात रुजू झाले असल्याने सिंदेवाही तालुका पत्रकार संघाचे वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.
. सिंदेवाही पंचायत समिती मध्ये अनेक पदे रिक्त असताना नुकतेच कार्यरत गट विकास अधिकारी सूक्रे यांची बदली करण्यात आली असल्याने पुन्हा एका प्रभारी अधिकारी या कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. नव्याने रुजू झालेले गट विकास अधिकारी हे मागील २०१५ ते २०१९ पर्यंत मुल येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हणून त्यांनी साडे वर्ष काम बघितले आहे. त्यानंतर ते भंडारा जिल्हा परिषद मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) म्हणून कार्यरत होते. ते मागील ३ महिन्यापूर्वी सिंदेवाही येथील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर येथे व्याख्याता म्हणून आले आहेत. त्यांना गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यालयाचा भरपूर अनुभव असल्याने ते सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण जनतेला योग्य न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्यसेवा, नागरिकांचे घरकुल, तसेच शेतकऱ्यांना मिळणारे शेतीविषयक अनुदान याकडे गांभीर्य पूर्वक लक्ष घालण्यासाठी सिंदेवाही तालुका पत्रकार संघाचा वतीने एक निवेदन सुद्धा देण्यात आले.
. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कामतवार, सचिव महेंद्र कोवले, सहसचिव अमोल बनसोड, कोषाध्यक्ष संदीप बांगडे, सदस्य अमन कुरेशी, सुनील गेडाम, प्रवीण नागदेवते, अमोल निनावे, प्रशांत गेडाम इत्यादी उपस्थित होते.


