Home सामाजिक जि .प. शाळा खामोना येथे शाळा पूर्वतयारी मेळावा साजरा

जि .प. शाळा खामोना येथे शाळा पूर्वतयारी मेळावा साजरा

1376

राजुरा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खामोना येथे शाळा पूर्वतयारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम सर्व नवीन भरतीपात्र विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांसोबत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बैलगाडी सजवून भजन मंडळी च्या तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक पुरूष , महिला, शि.व्य. स., ग्रामपंचायत आजी, माजी सदस्य उपस्थित राहून गावात प्रभात फेरी काढण्यात आली.

.     तदनंतर शाळेच्या परिसरात मुख्य कार्यक्रम साजरा करण्यात आला, यावेळेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पोटे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका, मदतनीस प्रौढ पुरुष व महिला उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांचे स्वागत व शाळा पूर्वतयारीची गरज काय ? यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आठ आठवडे चाललेल्या ह्या कार्यक्रमात कृतीपत्रिका व गुणवत्तेकडे पहिले पाऊल या पुस्तिकेतून विद्यार्थ्यांना पालक व माता पालकांनी फायदा कसा झाला ? याबद्दल विस्तृत माहिती शाळेचे मुख्याध्यापक संजय लांडे यांनी केले.

.     सर्व नवीन भरती पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत प्रत्येक स्टॉलवर उपस्थित असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधीद्वारे कृती करून घेण्यात आल्या व भाषा विकास, गणनपूर्व तयारी, सामाजिक व भावनिक विकास, बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता याबद्दल कृती घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शाळा व शिक्षण याविषयी आवड निर्माण करण्याचे कार्य याप्रसंगी सर्व विद्यार्थी प्रतिनिधी व शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अली यांनी केले. प्रास्ताविक लांडे यांनी केले. मार्गदर्शन भोयर यांनी तर आभार तामगाडगे यांनी केले.

error: Content is protected !!