Home निधन वार्ता सेवावृत्ती जोपसणारे माजी शिक्षकाचे निधन

सेवावृत्ती जोपसणारे माजी शिक्षकाचे निधन

1372

चंद्रपूर : तालुक्यातील पांढरकवडा येथील माजी आदर्श शिक्षक, ज्यांनी शेवटपर्यंत सेवावृत्ती जोपासली. अखेरच्या स्वशापर्यंत ही सेवा कायम ठेवली. अशा सेवावृत्ती जोपासणाऱ्या आदर्श शिक्षक गजानन नारायण मत्ते यांचे वृद्धापकाळाने मंगळवार (दि. १८) रोजी पांढरकवडा येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. ते पांढरकवडा येथील माजी सरपंच विजय मत्ते यांचे वडील होत.

.      शेतकरी कुटुंबात जन्मलेले गजाजन मत्ते यांनी त्या काळात आवड म्हणून शिक्षकी पेशा पत्करला. त्या काळी उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी, असा प्रघात होता. मात्र गजानन मत्ते यांनी प्रस्थापित व्यवस्था बाजूला सारून शिक्षकांची नोकरी केली. समाजात आदर्श शिक्षक कसा असावा, याचा पाया मजबूत केला. त्यांच्या या कार्याची दखल जिल्हा परिषद चंद्रपूर प्रशासनाने त्यावेळी घेतली होती. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी सोनी यांनी गजानन मत्ते यांच्या शिक्षकी पेशाची दखल घेऊन आदर्श शिक्षक म्हणून जिल्हा परिषद मार्फत गौरव केला होता. त्यांनी जीवनभर सहकारी शिक्षकांना आदर्शाचे धडे दिले. समाजाभिमुख कार्य केले. आजही त्यांचा चाहता वर्ग जिल्हाभरात आहे. अशा या सेवावृत्ती जोपसणाऱ्या आदर्श शिक्षकाच्या पार्थिवावर बुधवारी पांढरकवडा येथील स्म्शानभूमीवर साश्रु नयनांनी अंत्य संस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!