नागभीड : गट साधन केंद्र पंचायत समिती नागभीड समावेशित शिक्षण उपक्रमा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने होम थेरपी कीट च्या वापराबाबत दिनांक 21 मे ला विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
. प्रशिक्षणाची सुरुवात दिव्यांगाचे प्रेरणास्थान लुईस बेल व डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले. या प्रशिक्षणाला अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नागभीड संजय पालवे उपस्थीत होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रति पालकाची भूमिका तसेच साहित्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी बीट मौशी सुनीता भेंडारे तथा केंद्रप्रमुख केंद्र कोर्धा करंबे होते. तर प्रमुख मार्गदर्शक समावेशित तज्ञ छाया विंचुरकर, समावेशित तज्ञ विकास कुंभरे, विशेष शिक्षक रुपेश कोहपरे, विशेष शिक्षक नरेश काशीवार उपस्थित होते.
. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समावेशित तज्ञ छाया विंचुरकर तर सुत्रसंचालन विशेष शिक्षक रुपेश कोपरे यांनी केलं तसेच आभार प्रदर्शन समावेशित तज्ञ विकास कुंभरे यांनी केले.
. सदर प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्रातील सर्व साधण व्यक्ती, रोखपाल, ईएमआयएस कॉर्नेटर, समावेशित तज्ञ, विशेष शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.


