Home सामाजिक आनंदवनातील वृद्धांसोबत टरबूज, खरबूज कापून लग्नाचा वाढदिवस साजरा

आनंदवनातील वृद्धांसोबत टरबूज, खरबूज कापून लग्नाचा वाढदिवस साजरा

1372

वरोरा : समाजसेवेचे व्रत जोपासलेले आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथील कार्यरत कर्मचारी  असलेले प्रमोद नामदेव नागापुरे आणि त्यांच्या पत्नी विमा अभिकर्ता शारदा नागापुरे आनंदवनातील वृद्धांसोबत टरबूज, खरबूज कापून लग्नाचा 17 वा वाढदिवस अनोख्यापद्धतीने साजरा केला.

.      समाजात जीवन जगत असताना समाजाला काही देणं लागतो असे समजून ते गोरगरीब जनतेच्या, लग्नप्रसंगी, वाढदिवसा प्रसंगी, गोरगरीब कुटुंबांना, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून यथाशक्ती मदत करीत असतात. असे व्यक्तिमत्व प्रमोद नामदेव नागापुरे व पत्नी शारदा नागापुरे यांनी आपला लग्न वाढदिवस आनंदवन येथील सावली मध्ये राहणाऱ्या वृद्ध पुरुष व महिला यांना टरबूज व खरबूज कापून वाटप करून लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

.      यावेळी महारोगी सेवा समिती आनंदवन चें विश्वस्त  डॉ. विजय पोळ, आनंदवन ग्रामपंचायतचे उपसरपंच शौकत खान, आरोग्य सेविका कीर्ती लोहकरे, सरला चौधरी उपस्थित होते.

error: Content is protected !!