Home सामाजिक मुलांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका – ठाणेदार युगेंद्रसिंग यादव

मुलांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका – ठाणेदार युगेंद्रसिंग यादव

1346

पाचगाव येथे बाल संस्कार शिबिर 

वरोरा : आजची युवा पिढी लहानपणा पासूनच व्यसनाच्या आहारी गेली आहे. मुलांनो आत्तापासून व्यसनाच्या आहारी जाऊ नका कोणतेही व्यसन आपल्या आयुष्याची राख रांगोळीच करते. त्यामुळे आपल्याला खरी गरज आहे ती भारताचे संविधान आणि ग्रामगीता ची. संविधान आणि ग्रामगीता वाचाल तरच तुमचं पुढचं भविष्य उज्वल होणार असे प्रतिपादन पाचगाव येथे आयोजित बाल संस्कार शिबिरा दरम्यान शेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक युगेंद्रसिंग यादव यांनी शिबिरार्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

.       16 मे पासून  पाचगाव (ठा )येथे बाल संस्कार शिबिर सुरू आहे. या शिबिरा दरम्यान विविध उपक्रम राबविले जात असून या शिबिराला 120 मुलांनी सहभाग नोंदविला आहे. या शिबिरा दरम्यान लहान मुलांना संस्करचे बीज ग्रामगीता प्रसारक तसेच गुरुदेव सेवक मंडळाच्या वतीने रुजविले जात आहे.

.       यावेळी गुरुदेव सेवक माणिक डुकरे, मनोज ढोके, जनार्दन देठे, नामदेव सातपुते, स्वप्नील कुते, आशिष माणुसमारे, खीरटकर महाराज यादी सेवक हजर होते.

error: Content is protected !!