Home चंद्रपुर जिल्हा विशेष कापलेल्या सागाचे खुटे मातीत दडविण्याचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न

कापलेल्या सागाचे खुटे मातीत दडविण्याचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न

1384

विहीरगाव अवैध सागवान वृक्ष तोड प्रकरण

वनपरीक्षेत्र अधिकारी यांचावर प्रकरण उलटण्याची दाट शक्यता

नेरी : पळसगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मदनापूर उपक्षेत्रातील नियतक्षेत्र विहीरगाव क्र २ मध्ये मिश्र रोपवणातील मौलवान सागवानाची सागतस्करा कडून खुलेआम तोड करण्यात आली होती, मात्र स्थानिक नागरिकांच्या मार्फतीने प्रसार माध्यम प्रतिनिधीनी सदर चालत असलेला अवैध वृक्ष तोड गोरखप्रकार उजेडात आणल्यामुळे वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

.       सदर घडलेला प्रकार वरिष्ठ वनाधिकारी यांच्या नजरेस येऊ नये म्हणून वनकर्मचारी यांनी मजुराच्या हस्ते तोडलेल्या साग झाडाच्या खुटे सुद्धा माती व पालापाचोळा टाकून लपविण्याचा स्थानिक वनविभागाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. याची कल्पना नागरिकांनी दिली असून प्रतिनिधीनी तो प्रकर बाहेर काढला. अवैध साग तोड प्रकरणात स्थानीक वनपरीक्षेत्र अधिकारी, व वनपाल यांच्या कार्यशैली वर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून मागील दोन वर्षांपासून त्या ठिकाणाची अवैध तोड होत असताना त्या बीटातील वनपाल, वनाधिकारी हातावर हात देऊन बसले होते का ? कि नजर अंदाज करण्यात आला. त्यांचा नजरेत सदर प्रकार कसा घडला असाही प्रश्न उपस्थिती केल्या जात आहे.

.       सोन्याच्या किंमतीने विकल्या जाणाऱ्या सागवानाची अवैध तोड झाली आहे. त्यामुळे वनाधिकारी गप्प का असा प्रश्न निर्माण होत आहे? जेव्हा प्रतिनिधीनी माहितीसाठी वनपरीक्षेत्र यांच्याशी संपर्क केल्यास माहिती मिळत नाही. तेव्हा बिट वनकर्मचारी सोबत घटनास्थळी जाऊन संपूर्ण चौकशी केली असता सर्व वस्तूस्थिती दिसून पडली. अनेक साग वृक्षाची कत्तल करून चोरी केली गेल्याचे सागाच्या खुंट्यावरून उघडकीस आली त्यामुळे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी काय करीत होते असा प्रश्न आता निर्माण झाला आहे असल्या वनाधिकारी आणि वनकर्मचारी यांच्या गलथाण कारभारामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे.

.       वरिष्ठ अधिकारी यांना चौकशी बद्दल विचारले असता चौकशी चालू असल्याची माहिती मिळली आहे. अहवाल सादर केल्यानंतर कोणती कार्यवाही वनविभाग करेल याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!