Home पोलीस डायरी दाम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली ४० हजारानी गंडविले

दाम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली ४० हजारानी गंडविले

1357

हायपर फंड नावाच्या विदेशी कंपनीत केली होती गुंतवणूक

४o हजार भरून २० महिन्यात १५ लाख देण्याचे आमिष

भद्रावती : शहरातील एका भाजीविक्रेत्याला हायपर फंड नावाच्या विदेशीत कंपनीत ४० हजार गुंतवणूक करून २० महिन्यात १५ लाख देण्याचे आमिष देण्यात आले. आता कंपनी बंद झाल्याचे कारण समोर करून ४० हजाराची बहिण जावयाच्या भावाने फसगत केल्याची तक्रार पोलिसात केली. मात्र चार महिने लोटूनही फसगत करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचे फिर्यादीने पत्रकार परिषदेत सांगितले.

.     विलास नरहरी बुरचुंडे राहणार भद्रावती असे फसगत झालेल्याचे नाव आहे. फसवणूक करणारे बहिण जावई भीमराव चौधरी राहणार रामपूर त. राजुरा असे या नातलगाचे नाव आहे. विलास व भीमराव यांचे नातेसंबंध चांगलेच होते. विलास हा भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपली उपजीविका करतो. भीमराव हे रामपूर मध्ये हायपर फंड नावाची विदेशी कंपनी चालवत होते. त्यामध्ये विलास यांना रक्कम गुंतवणूक करण्यासंदर्भात सांगत होते. ४० हजार भरून २० महिन्यात १५ लाख रुपये देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. कंपनी बंद होणार नाही, फसवेगिरी होणार नाही, भविष्यात कंपनी जर बंद पडली तर जवळची रक्कम परत देऊ अशी हमी देण्यात आली. नातेसंबंध असल्याने दि. २८ फेब्रुवारी २०२२ ला बचत गटातून ४० हजार काढून विदेशी कंपनीत गुंतवणूक केली. मोबाईलवर त्या कंपनीचा ॲप टाकून देण्यात आला. त्या अॅप वर कंपनी विषयी माहिती येत होती. सहा महिने लोटल्यानंतर त्या अॅप वर माहिती येणे बंद झाले.

.     याकरता चौकशी केली असता कंपनी बंद पडली असे सांगण्यात आले. पैशाबाबत विचारणा केली असता सहा महिने थांबा असे भीमराव यांच्याकडून सांगण्यात आले त्यानंतर पुन्हा मोबाईलद्वारे चौकशी केली असता मोबाईलद्वारे कोणतेही उत्तर देत नव्हते त्यानंतर दुसऱ्याचा नंबर वरून फोन केला असता ओळखत नसल्याचे सांगून तुमची रक्कम मिळणार नाही काय होते ते करून घ्या अशी धमकावणी देण्यात आली. फसगत झाल्यानंतर दि. ३० जानेवारी २०२४ ला राजुरा पोलिसात तक्रार केली त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकाला निवेदन सुद्धा दिले मात्र न्याय मिळाला नाही असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले न्याय न मिळाल्यास पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करू असे विलास नरहरी बुरचुंडे व अल्का बुरचुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

error: Content is protected !!