Home पोलीस डायरी स्कार्पिओ व दुचाकीच्या भीषण अपघात

स्कार्पिओ व दुचाकीच्या भीषण अपघात

1359

दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जखमी

डोमा – शिवरा फाट्यावरील घटना

नेरी : चिमूर तालुक्यातील डोमा शिवरा फाट्यावर दि. 13 मेला सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कारपीओ चारचाकी वाहनाने तेंदूपत्ता तोडून डोमा गावाला जात असलेल्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार जागेवरच ठार झाला तर मागे बसलेली पत्नी ही गंभीर जखमी झाली. मात्र धडक होताच काही क्षणात दुचाकीला भीषण आग लागली आणि या आगीत संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली. वेळेचे अवधान साधून काही नागरिकांनी तात्काळ जखमी महिलेला आणि त्या मुत दुचाकीस्वार ला बाजूला केले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

.      तालुक्यातील डोमा येथील रहिवासी पतिपत्नी नामे श्रावण बाजीराव गुरनुले वय 55 वर्षे व कल्पना श्रावण गुरनुले वय 50 वर्षे हे पोटाची खळगी भरण्यासाठी तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी दुचाकी वाहनाने शिवरा लावारी सिरसपूर येथीलजंगल परिसरात तेंदूची पाने तोडण्यासाठी जात होते. मात्र आज नेहमीप्रमाणे पाने तोडून घराकडे दुचाकीने येत असताना डोमा शिवरा फाट्याजवळ भरधाव वेगाने येत असलेल्या स्कारपीओ चारचाकी वाहनाने दुचाकीला भीषण जोरदार धडक दिली. यात दुचाकी स्वार जागेवरच ठार झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली. यानंतर काही क्षणात दुचाकीने पेट घेतला आणि यात संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली.

.      मात्र जवळच नागरिक उपस्थित असल्याने त्यांनी तात्काळ दुचाकी जवळ पडलेल्या पती पत्नीला उचलले त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र स्कारपीओ चारचाकी वाहन हे धडक देऊन पोबारा केला सदर चारचाकी वाहन चिमूर मार्गाने शंकरपूर कडे जात होते सदर वाहनाला शंकरपूर येथे पकडण्यात आल्याची माहिती असून चालकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

.      सदर घटनेची माहिती मिळताच भिसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत नागरिकांनी पाणी टाकून पेटती दुचाकी विजवली पोलिसांनी मृत दुचाकीस्वार श्रावण गुरनुले यांच्या प्रेताचा पंचनामा करून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरनिय तपासणीसाठी पाठविण्यात आले तर पत्नी कल्पना हिला उपचारासाठी शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.

.      सदर दुर्दैवी घटनेने डोमा गावात शोककळा पसरली असून दुखसागरात बुडाला आहे. तेव्हा स्कारपीओ चालकांवर कठोर कारवाई करून कुटूंबाचे प्रमुख अपघातात निघून गेल्याने कुटूंब उघड्यावर आले आहे तेव्हा शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत

error: Content is protected !!