खांबाडा शेत शिवारातील घटना
नेरी : नेरी नवरगाव मार्गावरील खांबाडा शेतशिवरातील कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर चे सभापती मंगेश धाडसे यांच्या शेतातील विहीरिवर लावलेल्या सोलर पॅनल चे तीन सोलर प्लेट रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यानी लंपास केल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात चिंतेची भर पडली आहे.
. सदर सोलर पॅनल प्लेट मागील तीन ते चार दिवसांपूर्वी चोरल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सदर बाब ही शेतकरी याना लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस विभागाला माहिती तात्काळ पोलीस ए पी आय चौरे हे सहकार्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण चौकशी करून भुरट्या चोरांना पकडण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. तसेच या परिसरात अनेक छोट्या मोट्या चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे ढग निर्माण झाले आहे. कारण अनेक शेतकऱ्याचे साहित्य शेतात असतात मागील काही वर्षांपूर्वी शेतातील समान चोरी होत नव्हते मात्र आता चोऱ्याचे प्रमाण वाढले असून भुरट्या चोरांची संख्या वाढत आहे.
. तेव्हा या चोरांचे शोध घेऊन तात्काळ पकडून कारवाई करावे अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. सदर चोरीमुळे शेतकरी मंगेश धाडसे यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.


