Home पोलीस डायरी २० लाखाची अफरातफर, अभिकर्त्याविरोधात गुन्हा दाखल

२० लाखाची अफरातफर, अभिकर्त्याविरोधात गुन्हा दाखल

1325

नागभीड – खातेदारांच्या रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी नागभीड येथील एका पतसंस्थेच्या अभिकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अभिकर्त्याने २० लाख २ हजार ६३० रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.

.       शुभम उत्तम मेश्राम (२४) असे या अभिकर्त्याचे नाव असून तो या पतसंस्थेचा २०१९ पासून दैनिक अभिकर्ता म्हणून काम करीत असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार खातेदारांकडून रक्कम घेतल्यानंतर तो काही रक्कम पतसंस्थेत भरायचा आणि काही रक्कम स्वताकडेच ठेवायचा. काही दिवस त्याचे कृत्य बिनबोभाट चालले. मात्र एक दिवस त्याच्या या कृत्याची संचालक मंडळास शंका आली आणि पतसंस्थेने लेखापरीक्षण करण्याचे निश्चित केले.

.       लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार आरोपीने २० लाख २ हजार ६३० रूपयांची अफरातफर केली असल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम परत करावी यासाठी पतसंस्थेने अभिकर्त्यास प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन संधीही दिली. मात्र त्याने रक्कम परत न करता फरार झाला. शेवटी सदर अभिकर्त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. प्राप्त तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी भादंविच्या कलम ४०९, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार विजय राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि दीलीप पोटभरे व चमू करीत आहे.

error: Content is protected !!