Home पोलीस डायरी रामपुर जंगल परिसरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

रामपुर जंगल परिसरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

1344

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी वरून अगदी 3 की मी अंतरावर असलेल्या रामपुर जंगलात एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे पुष्पराज वासुदेव पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

.        नेरी जवळील रामपुर जंगलात तेंदूपत्ता सिजन सुरू झाल्याने आज पहाटेच्या सुमारास जंगलात काही महिला पाने तोडण्यासाठी गेल्या असता एका इसमाने झाडाला गळफास लागून असल्याचे दिसल्याने त्यांनी ही माहिती चिमूर पोलिसांना दूरध्वनी द्वारे दिली. याची माहिती पोलिस स्टेशनला मिळताच चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम आपल्या ताफ्यासहित तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पंचनामा केल्यानंतर मृतक इसम पुष्पराज वासुदेव पाटील (45) राहणार बोथली (वाहनगाव) येथील असल्याची ओळख पटल्यानंतर मृतदेह चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्याकरिता आणण्यात आले. मृत्युदेहाचे शव विचछेदन करून परिवाराच्या ताब्यात देण्यात आले.

.        मृतक पुष्पराज पाटील हे मजुरी करत असून त्यांना पत्नी व दोन मुले आहेत. मृतक पुष्पराज यांच्या आत्महत्येने पाटील परिसरावर शोककळा पसरली आहे. मृतक इसम दोन दिवसापासून घरातून गेल्याची माहिती पोलिस सुत्राना मिळाली असून घातपात तर नाही ना अशीही चर्चा सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष बागल यांचे मार्गदर्शनात दीप्ती मरकाम प्रमोद पढाल. शैलेश मडावी. राहुल चांदेकर करीत आहेत

error: Content is protected !!