चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 11 नामनिर्देशन पत्र दाखल

34

चंद्रपूर : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च 2024 रोजी 7 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन पत्र दाखल केले.

.      मंगळवार, दि. 26 मार्च रोजी विनोद कवडूची खोब्रागडे (अपक्ष), अशोक राणाजी राठोड (जय विदर्भ पाटी), अवचित श्यामराव सयाम (जनसेवा गोंडवाना पाटी), मधूकर विठ्ठल निस्ताने यांनी 2 अर्ज (प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया), धानोरकर प्रतिभा सुरेश (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद यांनी 4 अर्ज (भारतीय जनता पार्टी) आणि अतुल अशोक मुनगीनवार (अपक्ष)  यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी 16 इच्छूकांनी अर्जाची उचल  केली आहे.

.      नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा उद्या बुधवार शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.