राजुरा : महाराष्ट्र राज्य हँडबॉल संघटनेद्वारा आयोजित ४९ वी महाराष्ट्र वरिष्ठ गट पुरुष अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा २०२४ चे आयोजन कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र हायस्कूल आणि कनिष्ठ विद्यालय गाँधी मैदान शिवाजी पेठ कोल्हापूर येथे २३ ते २५ मार्च २०२४ रोजी करण्यात आले आहे.
. या स्पर्धेत राज्यभरातील प्रत्येक जिल्हा संघ सहभागी होणार आहे. चंद्रपूर जिल्हा हँडबॉल संघटनेतर्फे सदर स्पर्धेकरिता जिल्हातील उत्तम खेळाडू निवड चाचणीतून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता खेळाडूंची निवड करण्यात आली.
. सदर खेळाडू कोल्हापूर महाराष्ट्र हायस्कूल आणि कनिष्ठ विद्यालय गाँधी मैदान शिवाजी पेठ कोल्हापूर येथे चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असून राज्यस्तरीय हँडबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्हा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष अनिल धानोरकर, सचिव प्रकाश तुमाने, प्रा. विकी पेटकर, प्रा.पूर्वा खेरकर,प्रा. संगीता बांबोडे,वर्षा कोयचाडे, भारती पाल, आनंद नगराळे, बाळू वडस्कर, तसेच बामणवाडा व चुनाळा ग्रामस्थांनी आणि मित्र परिवार यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.


