संस्कार व बौद्धिक ज्ञानाला महत्त्व देणे गरजेचे : संजय गजपुरे

43

सरस्वती ज्ञान मंदिर शाळेत वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप

नागभीड : आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर कठोर परिश्रम करणे फार आवश्यक आहे. यश मिळविण्यासाठी गुणात्मकतेला जितके महत्व देतो तितकेच महत्व संस्कार व बौद्धिक ज्ञानाला दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले आई वडील, शाळा, शिक्षक यांचे नाव मोठे केले पाहिजे, हिच खरी त्यांच्यासाठी गुरुदक्षिणा असते. शाळेत मिळालेल्या गुणात्मक, संस्कारमय व बौद्धिक शिदोरीचा वापर करून आपण जीवनात यश प्राप्त केले पाहिजे असे प्रतिपादन संजय गजपुरे यांनी नागभीड येथील सरस्वती ज्ञान मंदिर च्या वर्ग सातवीच्या विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी केले.

.      यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे, सहा.शिक्षिका किरण वाडीकर, आशा राजुरकर सहा.शिक्षक, आशिष गोंडाने, पराग भानारकर, सतीश जिवतोडे, मेघा राऊत, पूजा जिवतोडे, श्रद्धा वाढई यांची उपस्थिती होती.

.      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीची विदयार्थिनी लक्ष्मी डहारे हिने केले तर आभार आर्यन खरकाटे याने मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अथक परीश्रम घेतले.