Home चंद्रपुर जिल्हा विशेष निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना करावे लागणार बँक खात्याला आधार लिंक

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना करावे लागणार बँक खात्याला आधार लिंक

1266
  • कागदपत्रे तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आदेश

पंकज रणदिवे

    नेरी : शासन वयोवृध्द नागरिकांना अर्थसहाय्य व जीवन जगण्यासाठी आधार म्हणून विशेष सहाय्य योजनेअंतर्गत श्रावणबाळ, विधवा अशा अनेक योजना राबवित आहे. आता पर्यंत लाभार्थ्यांनी दिलेल्या खात्यात तहसीलदार यांच्या वतीने पैसे वितरित होत होते. मात्र आता सर्व प्रकारचे अनुदान सरळ लाभार्थ्यांच्या बँक खाते मध्ये जमा होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना बँक खात्या सोबत आधार लिंक करने गरजेचे राहणार आहे.

.      आपले सरकार डी.बि.टी. पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक पासबुक, आधार कार्ड, राशन कार्ड, मोबाईल क्रमांक 25 मार्च पर्यंत तहसील कार्यालय चिमूर येथे सादर करण्याचे आदेश काढलेले आहे. ज्या नागरिकांचे कागदपत्रे तहसिल कार्यालयात जमा होणार नाही अश्यांचे अनुदान जमा होणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निराधार वयोवृद्ध जनतेचे चांगलेच हाल होणार आहे. एकीकडे शासन निराधार, वयोवृध्द नागरिकांना जागेवर सुविधा देण्याचं प्रयत्न करीत असताना मात्र तहसिल विभागाने काढलेले फर्मान अचंबित करणारे असून यामुळे हजारोंची गर्दी तहसील कार्यालयात पहावयास मिळणारं आहे. त्यातच वयोवृद्ध नागरिकांना जीवघेणा प्रवास सुद्धा करावं लागणार आहे.

.     त्यामुळे तहसील प्रशासनाने वयोवृध्द नागरिकांनी आधार, बँक पासबुक, राशन कार्ड व मोबाईल क्रमांक तहसील कार्यालयात जमा करण्याचे फर्मान वापस घेऊन सादर जबाबदारी ग्रामपंचायत, तलाठी किंवा पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचे कडे जमा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत.

error: Content is protected !!