Home पोलीस डायरी अवैध मुरुमाचे वाहतूक करणारे जीआरआयएल कंपनीचे ५ हायवा ट्रॅक पकडले

अवैध मुरुमाचे वाहतूक करणारे जीआरआयएल कंपनीचे ५ हायवा ट्रॅक पकडले

1205
  • गौण खनिजाचे क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन
  • पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई

गडचांदूर : राजुरा, गोवींदपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी जीआरआयएल कंपनी कडून समतेपेक्षा अधिक उत्खनन केल्या जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना मिळतात स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाने त्यांच्या निर्देशावरून पथक निर्माण करून 8 मार्च रोजी रात्री अंदाजे 11 च्या सुमारास येथील देवघाट नाल्यावर धाड टाकली असता रात्रीच्या अंधारात अवैधरीत्या उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले.

.      यात एक पोकलेन व हाड्रा मशीन तसेच वाहतूक होत असलेले रेती मिश्रीत दगड भरलेले 5 हायवा ट्रक व गौण खनिज भरण्याच्या तयारीत असलेले 12 खाली हायवा ट्रक मोक्यावर पकडले. नंतर खाली ट्रक सोडण्यात आले. मात्र, मशीन व 5 भरलेले हायवा ट्रक ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा केले.

.      सध्या राजुरा, गोवींदपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाचे कंत्राट जीआरआयएल कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी सदर कंत्राटदार कंपनीला नाल्यावरून रेती व्यतिरिक्त उत्खननासाठी 24 मार्चपर्यंत 53 हजार ब्रास उत्खननाची मंजुरी असल्याचे कळते. मात्र, येथे संपूर्ण नाला पोखरून लाखो ब्रास उत्खनन सुरू आहे. 30 सप्टेबर 2023 पर्यंत मंजूर आदेशा प्रमाणे 52 हजार 500 ब्रास उत्खनन झाले. गेल्या 4 महिन्यापासून अविरत 24 तास उत्खनन करून शासनाच्या स्वामीत्वधनाला चुना लावण्यात आला. खनिकर्म विभाग, महसूल विभाग यांना याठिकाणी सुरू असलेल्या अवैध उत्खननाची माहिती होती. मात्र, यांच्या दुर्लक्षितपणामुळे शासनाच्या महसुलावर पाणी फिरले व अतिरिक्त उत्खनन वसूल करण्यात आला नाही. असे आरोप होताना दिसून येत आहे.

.      नाले संपूर्ण पोखरल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली. तालुका स्तरावरून कारवाई होत नसल्याने शेवटी जिल्हा पोलीस अधिक्षकांना याची माहिती मिळताच सदर घाटावर तहसीलदार व ठाणेदार यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले व कारवाई केली. परिक्षाविधीन अधिकारी रणजीत यादव यांच्या कारवाई नंतरची ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. देवघाट नाल्यावर 53 हजार ब्रासची परवानगी होती. यानंतर जिल्हाधिकारी यांनी कोणतीच परवानगी दिली नसल्याची माहिती आहे. असे असताना यांनी गेल्या 4 महिन्यात रात्रंदिवस उत्खनन केले. याविषयी महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, यांच्याकडे अनेक तक्रारी प्रलंबीत असून चौकशी, पंचनामा, असे काही झाले नाही. शेवटी आताच नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षकांनीच याची दखल घेतल्यामूळे धडक कारवाई करण्यात आली हे मात्र विशेष. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार या धडक कारवाईची कौतुकास्पद चर्चा तालुक्यात जोरात सुरू आहे. आता तहसीलदार या नियमबाह्य उत्खननावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!