Home सामाजिक विसापूर येथील संत रविदास मंदिरात जागतिक महिला दिन साजरा

विसापूर येथील संत रविदास मंदिरात जागतिक महिला दिन साजरा

1254

विसापूर : येथील संत रविदास समाज मंदिरात जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने तथा संत रविदास महिला मंडळाच्या वतीने शुक्रवारी जागतिक महिला दिनांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व संत रविदास महाराज यांच्या फोटो व पुतळ्याला मालार्पन करुन अभिवादन करण्यात आले.

.         यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष समीक्षा भटवलकर होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून विसापूर शाखेच्या सचिव संध्या वाडेकर, संत रविदास महिला मंडळाच्या अध्यक्ष आरती लिपटे, जेष्ठ सदस्या शैला खंडाळे, इंदिरा नवले, देविका गुजरकर, काजल नवले, शीतल लिपटे, वैशाली वाढई, वैशाली काकडे, मीरा खंडाळे, मीरा लिपटे, सोनू बांगडे, मीरा दुबे, निमुना मुळे आदि उपस्थित होते.

.         समीक्षा भटवलकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या, आपल्या समाजाच्या हितासाठी संत रविदास महाराज यांनी नवी चेतना दिली. या चेतनेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करून कळस चढविला. म्हणून आजघडीला महिलांनी सर्वच क्षेत्र व्यापले आहे. यामुळेच आपला जागतिक स्तरावर सन्मान केला जात आहे. याचे सर्वाधिक श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आपण दिले पाहिजे, असे त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

error: Content is protected !!