Home चंद्रपुर जिल्हा विशेष मुलीला विहिरीत ढकलत तिने स्वतःलाही संपविले

मुलीला विहिरीत ढकलत तिने स्वतःलाही संपविले

1210
  • दोन्ही मुलांना मारण्याचा होता प्रयत्न
  • आईच्या हाताला झटका देत पळाल्याने मुलगा बचावला
  • सावली तालुक्यातील दुर्दैवी घटना
  • किडनीच्या आजाराने त्रस्त होती महिला

चंद्रपूर : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका मातेने आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आईने विहीर गाठली. विहिरी जवळ गेल्यावर मुलीला विहिरीत ढकलले मात्र मुलाने आईचा हात झटकून तिथून पळ काढला. त्यानंतर आईने विहिरीत उडी घेतली. या घटनेत माय-लेकीचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येताच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सावली तालुक्यातील खेडी येथे ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजताचा सुमारास उघडकीस आली. दर्शना दीपक पेटकर (३५), समीक्षा दीपक पेटकर (१४) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत.

.        प्राप्त माहितीनुसार, मूल शहरातील दीपक पेटकर यांची खेडी शिवारात शेती आहे. पत्नी दर्शना, मुलगी समीक्षा आणि मुलगा सोहन हे शेतात गेले होते. आई दर्शनाने दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास स्वत:च्या शेताला लागूनच असलेल्या शेतकऱ्याच्या विहिरीत मुलगी समीक्षा हिला ढकललं. त्यानंतर त्यांनी मुलगा सोहन याचा हात पकडून विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोहनने हात झटकून तिथून खेडी गावात पळ काढला. मुलगा गावात गेल्याचे पाहून आई दर्शनानेही त्याच विहिरीत उडी घेतली. यात माय-लेकीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार जीवन राजगुरु, हवालदार मोहुर्ले, पोलिस कर्मचारी कपिल भंडारवार यांनी घटनास्थळ गाठले. दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

.        शवविच्छेदनासाठी मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मृत महिला किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. काही महिन्यांपूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची चर्चा आहे. पुढील तपास सावली पोलिस करीत आहेत. पण, या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

error: Content is protected !!