नंदकिशोर तूमराम यांचे निधन

28

सिंदेवाही : आदिवासी मागासवर्ग शिक्षण मंडळ सिंदेवाही येथील कार्याध्यक्ष नंदकिशोर तूमराम यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने गडचिरोली येथील शासकीय सामान्य रुग्णालयात सोमवारी दुपारी एक वाजता दुःखद निधन झाले. त्यानंतर त्यांचे शव सिंदेवाही (जाटलापूर) येथील त्यांचे राहते घरी आणण्यात आले असून आज सकाळी १० वाजता सिंदेवाही येथील मोक्षधाम येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. ते मागासवर्गीय हायस्कूल वासेरा इथून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.