- चिमूर – वरोरा महामार्गावरील घटना
चिमूर : चिमूर – रेती भरून खडसंगी कडे जात असलेला ट्रॅक्टर व वरोरा कडून चिमूर कडे जात असलेल्या ट्रक चा अपघात घडला यात ट्रॅक्टर वर बसलेला मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार २ मार्चच्या मध्यरांत्री १.३० वाजताच्या सुमारास वरोरा चिमूर मार्गांवरील शेडेगाव गावाजवळ घडली.
. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक सी जी आर 9535 हा वरोराकडून चिमूर कडे येत असताना त्याच वेळी रेती भरून असलेला ट्रॅक्टर नंबर MH 34 AP 2926 चिमूर वरून खडसंगी कडे जात असताना ट्रक–ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली त्यावेळी रेती भरलेल्या ट्रॅक्टर च्या ट्रालीवर बसलेला मजूराचा जागीच मृत्यू झाला मृतकाचे नाव सचीन रामदास सोनवाने (२५) हा बंदर येथील रहिवासी असून २ वर्षांपासून चिमूर येथील एका ट्रॅक्टरवर कामावर होता अशी माहिती आहे सचिन च्या . मागे आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे.
. मध्यरात्री घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक चावरे, मानकर , अवधूत, पोलिस कर्मचारी यांनी धाव घेत पंचनामा करून सचिन चा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असुन ट्रॅक्टर व ट्रक दोन्ही चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


