Home चंद्रपुर जिल्हा विशेष  अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

 अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

1171

वरोरा : वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर हायवे,मौजा पिंपळगाव ते टेमुर्डा रोडवर पायदळ जाणाऱ्या महीलेस एका अज्ञात वाहनाने धडक देवून जखमी केले. सदर महीलेस उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे भरती केले. त्यानंतर पुढील उपचाराकरीता मेडीकल कॉलेज, नागपूर येथे भरती करण्यात आले. सदर अनोळखी महीला उपचारादरम्यान मृत पावली. अनोळखी मृत  महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर  मृत  महिलेची  ओळख  पटविण्याचे  आवाहन  पोलीस स्टेशन, वरोरा मार्फत करण्यात येत आहे.

मृतक महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे : वय अंदाजे 40 वर्ष, रंग सावळा, डोक्याचे केस काळे पांढरे व बेबी कट, चेहरा लांबट,  अंगात दवाखान्याचा पांढऱ्या रंगाचा ड्रेस परीधान केलेला आहे. या वर्णनावरुन सदर मृतक महिलेला कोणी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन, वरोरा येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!