चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागभिड येथील विविध व्यवसायातील निरुपयोगी, कालबाह्य झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य, उपकरणे आहे त्याच अवस्थेत विक्री करावयाचे आहे. याकरीता दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
. ईच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एम.आय.डी.सी.परीसर, नागभिड येथे अधिकृत लेख्यासह उपस्थित राहावे. असे नागभिड, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.एम. डांगे यांनी कळविले आहे.


