शंकर चांभारे यांचे निधन

28

भद्रावती – श्रीनगर कॉलनी येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त वेकोली कर्मचारी शंकर चांभारे (62 )यांचे दिनांक 17 फेब्रुवारीला रात्री 11:30 वाजता दरम्यान राहते घरी निधन झाले.

.       शंकर चांभारे यांना काही दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर नागपूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. दिनांक 16 ला भद्रावती येथे घरी येतात त्यांची दि. 17 ला प्रकृती अचानक बिघडली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दि. 18 फेब्रुवारीला भद्रावती येथील पिंडोनी स्मशान भूमीवर त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सहा मुली नातू नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. वेकोली नेते मोरेश्वर आवारी यांचे अध्यक्षतेत शोक सभा पार पडली यावेळी बराच मोठा आप्तपरिवार, नातेवाईकांची उपस्थिती होती.