गावात येत पाळीव जनवरांवर हल्ला
मुल : तालुक्यातील एमआयडीसी लगत असलेल्या मरेगावं येथे गेल्या दोन दिवसापासून वाघाने धुमाकूळ घातला असुन मरेगाव येथे गावालगत असलेल्या शेतात शेळ्या चारणाऱ्या आशिष दुधकुवर या युवकावर बिबट्याने हल्ला करीत त्याला जखमी केले. तीच दहशत सपण्याच्या अगोदरच रात्रौ गावात वाघाने प्रवेश करीत पाळीव जनावरावर हल्ला करीत गाय आणि म्हशीला ठार करीत एका गाय व वासराला जखमी केले.
. रात्रौ दोन वाजताच्या दरम्यान मुरलीधर वाकूडकर आणी विलास उईके यांच्या गोठ्यात प्रवेश करीत वाघाने गरोदर गाय वासरु आणी म्हशीवर हल्ला करीत गाईला आणी म्हशीला ठार केले तर एक गाई आणी वासराला गंभीर जखमी केले. यामुळे शेतकऱ्याची मोठी आर्थिक नुकसान झाली आहे. लागोपाठ घडलेल्या घटनामुळे मरेगावं वासीय भयभीत झाली असुन वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांच्या मनातील भीती वनविभागाणे दूर करावी . अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल. संदीप कारमवार, अध्यक्ष विविध कार्यकारी संस्था मुलं