नेरी : खरीप हंगाम आटोपला असून शेतकरी वर्गाच्या हाताला काम नसल्याने वर्षभर शेतात काम करावे लागते आणि नेहमीच व्यस्त राहावे लागते तेव्हा या शेतकरी बंधूंचा विरंगुळा व्हावा आणि मोकळ्या मनाने तणावमुक्त आनंद घेता यावा यासाठी काजळसर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असून शेतकऱ्यांच्या नदीबैलाचे खेळ (शर्यत) सुद्धा आयोजित केले आहे
. या मेळाव्याचे उदघाटन सरपंच आशिष ननावरे अध्यक्ष विश्वास सामुसाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात अनेक शेतकऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले अनेक शेतकऱ्यांनी बैल जोडी आणली असून अनेक दिवस पर्यंत हा मेळावा चालणार असल्याचे सांगितले आहे.
. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ शाम हटवादे नेरी, ना भी सामुसाकडे, हरिदास मडावी, अजित सुकारे मोटेगाव, अनंता कावळे, विजय सोनवाने, रामु मडावी, उत्तम खोब्रागडे अनिकेत नागपुरे, सुधाकर सोनवाने मनोहर चौधरी, खाटू घोनमोडे आदी सह शेतकरी बांधव व गावकरी उपस्थित होते.


