पंडित दीनदयाल वार्डात इसम जखमी
वार्डातील नागरिकांत वन्य प्राण्यांची भीती
विसापूर : बल्लारपूर वन विभाग अंतर्गत विसापूर शेतशिवारात काल शनिवारी वन विभागाच्या पथकाने एका अशक्त बिबट जेरबंद केला. त्याच दिवशी मध्यरात्री बल्लारपूर शहरातील पंडित दीनदयाल वार्ड व पेपर मिल न्यू कॅालनि परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला. एका घरात रात्री बिबट्याने प्रवेश करून इसमाला जखमी केल्याची घटना घडली. यामुळे बल्लारपूर शहरात जंगलव्याप्त वसाहतीत नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पेपर मिल न्यू कॅलोनी जवळ लागून असलेल्या पंडित दीनदयाल वार्डात सोमनाथ जयस्वाल ( ५५ ) यांचे घरात बिबट आला. त्यावेळी आरडाओरड करून बिबट्याला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात त्याचा हाताला गंभीर जखम झाली. यापूर्वी देखील एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला होता. यामुळे या परिसरात नागरिकात वन्य प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती बल्लारपूर वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना तातडीने नागरिकांनी दिली. दरम्यान वन विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री 3 वाजता पर्यंत बिबटयाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आरडाओरड केल्याने जंगलात धूम ठोकली असावी, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला. मानव व वन्य प्राण्याचा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
” वन्य प्राणी व मानव यातील संघर्ष टाळण्यासाठी वन विभाग दक्षता घेत आहे. कालच एक बिबट जेरबंद केला. त्याच रात्री पंडित दीनदयाल वार्डात बिबट आल्याची माहिती मिळाली. आमचे दहा जणांचे पथक त्या परिसरात गस्तीवर आहे. वन्य प्राण्यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन महत्वाच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहे. वरिष्ठ अधिकारी यांचेकडे बिबट जेरबंद करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. नरेश भोवरे, वन परीक्षेत्र अधिकारी वन परीक्षेत्र अधिकारी कार्यालय ( प्रादेशिक) बल्लारशाह.”


