Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसापूर शेतशिवारात बिबट्याचे दर्शन

विसापूर शेतशिवारात बिबट्याचे दर्शन

1114

बल्लारपूर वन विभागाच्या पथकाने बिबट्याला केले जेरबंद

विसापूर शेतशिवारात नाल्याजवळ होता दडी मारून

शेळ्या चराईसाठी गेलेल्या इसमाने दिली होती माहिती

विसापूर : बल्लारपूर पेपर मिल वसाहत व विसापूर शेतशिवारात शेतकऱ्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन घडले होते.यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आज शनिवार ( दि. १७ ) दुपारी 3 वाजता दरम्यान शेळ्या चराईसाठी गेलेल्या इसमाला बिबट विसापूर शेतशिवराजवळ नाल्याशेजारी एका झुडूपात बिबट असल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती वन विभागला दिली.वन विभागाच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करून बिबट जेरबंद करण्यास यश मिळविले. ही कारवाई बल्लारपूर वन विभागाने आज शनिवारी सायंकाळी ४.30 वाजता दरम्यान विसापूरच्या शेतशिवारात केली.

.       मागील काही दिवसापासून एका बिबट्याचा वावर बल्लारपूर पेपर मिल वसाहत,जुने पावर हॉउस परिसर व बल्लारपूर – विसापूर मार्गावरील शेतशिवारात असल्याचे दिसून आले होते. यामुळे ये – जा करणाऱ्या नागरिकांत व शेतशिवारात कामाला जाणाऱ्या मजुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच आज शनिवारी विसापूर येथील दिलीप टोंगे यांच्या शेताजवळील नाल्याशेजारी एका झुडूपात बिबट दडी मारून असल्याचे भाऊजी डाहुले हे शेळ्या चारत असताना बिबट दिसला. त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. ही माहिती मिळताच बल्लारशाह वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बिबट हालचाल करून केवळ डरकाळी देत होता. तो जाग्यावरून हलत नव्हता. तो बिबट अशक्त दिसून येत होता. कदाचित त्याला मार लागला असावा. याची माहिती मध्य चांदा वन विभागाचे सहायक वन संरक्षक आदेशकुमार शेंडे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, क्षेत्र सहायक कोमल घुगलोत, पशुवैद्यकीय अधिकार डा. कुंदन पोडचलवार, शुटर बी.एम.वनकर, डी. एम.दुपारे, वनरक्षक वर्षा पिपरे यांच्या पथकाने बिबटला बेशुद्ध करून जेरबंद केले.

error: Content is protected !!