शेतकरी राजा, ओबीसी राजा, जागा हो, आंदोलनाचा धागा हो

391

शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण

उपोषणाचा तिसरा दिवस : प्रकृती हालावली

वरोरा : शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आसाळा येथील शेतकरी किशोर डुकरे यांचे 3 दिवसापासून तहसील कार्यालय वरोरा च्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी किशोर डुकरे यांना उपोषण मंडपात भोवळ आल्याने त्यांची प्रकृती खालावली असून उपोषण मंडपात वैद्यकीय अधिकार्‍यांनी भेट देत त्यांना सलाईन लावण्यात आली. दिवस भर उपोषण मंडपाला पत्रकार संघ, राजकीय नेते, सरपंच संघटना यांनी भेटी देत उपोषणाला पाठींबा दर्शविला.

.        दिनांक 12 व 13 फेब्रुवारी रोजी किशोर डुकरे यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर दिनांक 13 फेब्रुवारीच्या सायंकाळी 7 वाजतापासून आमरण उपोषण सुरू केले. आज या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपोषण मंडपात भोवळ आली. यामुळे प्रशासनात धावाधाव सुरू झाली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करून डुकरे यांच्यावर तात्काळ  उपचार करून त्यांना मंडपातच सलाईन लावण्यात आली. डुकरे यांना उपोषण मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून सूचना दिल्या जात आहे. मात्र डुकरे हे आपल्या विचारावर ठाम असून जोपर्यंत शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत उपोषण चालूच राहणार. असा इशारा डुकरे यांनी प्रशासनाला दिला आहे. किशोर डूकरे यांच्या आंदोलनाला विविध संघटनाकडून पाठींबा दर्शविला जात आहे. आज गुरवारी विविध पत्रकार संघटना, सरपंच संघटना व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, सदस्य अभिजीत पावडे, राष्ट्रवादी कोंग्रेस वरोरा विधानसभा प्रमुख विलास नेरकर, विद्यार्थी कोंग्रेस चे तालुकाध्यक्ष रूपेश तेलंग यांनी उपोषण मंडपाला भेट देत किशोर डुकरे यांच्या प्रकृतीची विचारणा करत पाठींबा दर्शविला.

 मनसे वाहतूक सेना प्रदेशाध्यक्ष आरीफ शेख यांची उपोषण मंडपाला भेट                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक  सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आरीफ शेख हे विदर्भ दौर्‍यावर असताना शेतकर्‍यांच्या समस्येसाठी वरोरा येथे एक शेतकरी आमरण उपोषण करत असल्याची माहिती मिळताच आरीफ शेख यांनी किशोर डुकरे यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी तहसीलदार वरोरा यांच्याशी चर्चा केली. तर पीक विमा कंपनीच्या मुख्य अधिकार्‍याशी मोबाइल द्वारे चर्चा करीत नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ पीक विमा देण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्रात पीक विमा कंपनीचे कार्यालयच राहणार नाही. असा इशारा देत पीक विमा कंपनीच्या अधिकार्‍यांची चांगलीच कान उघाळणी केली. किशोर डुकरे यांच्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोबत असल्याचे ही त्यांनी यावेळी डुकरे यांना सांगितले. यावेळी महसूल व पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तथा मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, उपाध्यक्ष राजू कुकडे, विधानसभा संघटक राहुल खारकर व मनसे कार्यकर्ते  उपस्थित होते.