Home सामाजिक राष्ट्रसंताच्या जयघोषाने दुमदुमली अडेगाव (को) नगरी

राष्ट्रसंताच्या जयघोषाने दुमदुमली अडेगाव (को) नगरी

1237

नेरी : नेरी जवळील अडेगाव येथे गुरुदेव सेवा मंडळ व संपूर्ण ग्रामवाशीयांच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची दोन दिवसीय 55 वी पुण्यतिथी महोत्सव मोट्या उत्साहात साजरा करण्यात आला.

.          या दोन दिवसीय पुण्यतिथि दरम्यान दररोज ग्रामसाफई , सामुदायिक ध्यान , हभप मगरे महाराज व हभप एकनाथ बोरकर यांच्या हस्ते घटस्थापणा करण्यात आली. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुमित्राबाई चौखे खांबाडा यांनी महिलांना प्रबोधन केले यावेळी मान्यवर म्हणून वच्छला चौधरी अनिता झोडे मायाबाई लोखंडे अनिता मसराम छया झोडे उपस्थित होत्या तथा गावातील संपूर्ण महिला मंडळींनी भाग घेतला होता सायंकाळी सामुदायिक प्रथनावर सोनवाने गुरुजी खुंटाळा यांनी मार्गदर्शन केले लगेच जागृती भजनाचे आयोजन करण्यात येत होते यात सिरपुर गोरवठ अडेगाव को नवतला लोहारा खुंटाळा लावारी हरणी पिपळगाव काजळसर आदी भजन मंडळांनी भाग घेतला होता.

.          दि 7 फरवरी ला ग्रामसफाई करून रामधून वाजत गाजत महाराज्यांच्या पालखी सह गावातून मुख्य मार्गाने काढण्यात आली ढोल तश्या आणि टाळ मुदनगाच्या निनादात व राष्ट्रसंताच्या जयघोषात मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली यावेळी अडेगाव को व बोथली येथील भजन मंडळांनी पालखी मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता
यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हभप मगरे महाराज यांच्या सुरेख वाणीतून कीर्तन पार पडले गोपाळकाळा सुखदेव धारने महाराजांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी एकनाथ बोरकर , हिरामण गेडाम, बाबूराव आळे, वसंता गेडाम, विजय चौधरी, निळकंठ गेडाम, बाळू पा झोडे, हरीचंद्र लोखंडे, विश्वनाथ झोडे आदि सह गुरुदेव सेवा मंडळ व गावकऱ्यांनी सहकार्य केले मौन श्रद्धांजली अर्पण करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!