Home सामाजिक आजपासून अगरझरीत 3 दिवसीय युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबीर

आजपासून अगरझरीत 3 दिवसीय युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबीर

1259
चंद्रपूर : स्पार्क जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून युवांसाठी उभारण्यात आलेल्या स्पार्क युवाच्या वतीने ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान ताडोबा मार्गावरील आगरझरी येथे युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
.          या शिबिरात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील निवडक महाविद्यालयातील युवा सहभागी होत आहे. महाराष्ट्रातील सामजिक, सांस्कृतिक, राजकीय, युवा चळवळीत कार्य करणाऱ्या दिग्गज व्यक्तींना शिबिरात आमंत्रित करण्यात आले आहे.
.          या तीन दिवसीय निवासी शिबिरात भविष्यातील नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने युवांना प्रशिक्षण देण्यात येईल. वक्तृत्व, अभिनय, पथनाट्य आदीबाबतही मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती स्पार्क युवाच्या जिल्हा संयोजिका राधिका दोरखंडे यांनी दिली.
error: Content is protected !!