११ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त
आठ जणांना अटक
वरोरा : शहरालगतच्या बोर्डा चौकात जुगार अड्ड्यावर चंद्रपूर येथील एलसीबी पथकाने रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास केलेल्या छापीमारीत ११ लाख ४६ हजारांच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक केली आहे.
. वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा बोर्डा चौकात एका धाब्याच्या मागे जुगार जुगार चालत असल्याची माहिती सूत्रधाराकडून चंद्रपूर एलसीडी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक विनोद भूरले, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, गजानन नागरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत नागोसे, चालक पोलीस हवालदार दिनेश अराडे यांच्या पथकाने रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास छापा मारला. यावेळी काही व्यक्ती ५२ पत्त्यांच्या ताशवर जुगार खेळत असल्याचे आढळून आले. अशा आठ आरोपींना ताब्यात घेऊन रोख रक्कम, मोटारसायकल, स्कॉर्पिओ वाहनासह एकूण ११,४६,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
. सदर प्रकरणात रवींद्र बद्री पाटील, रा. जामगाव खुर्द, सुभाष असुटकर बोर्डा, प्रफुल मुन वरोरा, विजय बांदुरकर बोर्डा, दारासिंग बदखल वरोरा, आशिष मेडपल्लिवर बोर्डा, सय्यद जुबेर वरोरा, अमोल झाडे जामगाव या आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन वरोरा येथे अपराध क्र. १०८/२४ कलम १२(अ) म.जु.का. प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे.