Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपुरात बहुजन समाजाचे भव्य महामोर्च्याचे आयोजन

चंद्रपुरात बहुजन समाजाचे भव्य महामोर्च्याचे आयोजन

1396
  • वरोरा येथे ओबीसी, व्हीजेएनटी,एसबीसी,अनुसुचित जाती – जमाती संयुक्त महामोर्चा ची सभा संपन्न.

चंद्रपुर : ओबीसी,व्ही.जे.एन.टी.एस.बी.सी,अनु.जाती,अनु.जमाती या बहुजन समाजाचा महामोर्चा गांधी चौक चंद्रपूर ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य महामोर्च्याचे आयोजन केलेले आहे. त्या अनुषंगाने वरोरा येथे समाज बांधव व तालुक्यातील कार्यरत सर्व पक्षांच्या पदाधिका-यांची संयुक्त सभा आमदार प्रतिभा धानोरकर यांचे अध्यक्षतेखाली स्थानिक कटारिया मंगल कार्यालय वरोरा येथे शनिवारी पार पडली.

.         या सभेला प्रमुख मार्गदर्शक महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ,प्रमुख अतिथी कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, जिल्हाध्यक्ष कृष्णा मसराम आदिवासी विकास परिषद,चंद्रपूर,सर्व समाज पदाधिकारी गजानन बोढाले,जयंत ठाकरे,गजानन मेश्राम, नरेंद्र धांडे, रमेश मेश्राम, चक्रधर साठे,.गजानन वांढरे, नगाजी साळवे, हरिभाऊ भाजीपाले, राजू डोंगरे, विलास खोंड, विजय आंबेकर, मुकेश जिवतोडे शिवसेना(उबाठा), विधानसभा प्रमुख विलास नेरकर राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी, सुरेश महाजन.विनोद सोनटक्के तथा आयोजक शाम लेडे यांचे प्रमुख उपस्थिती संपन्न झाली.

.         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक शाम लेडे यांनी सदर महामोर्च्याची व शासन जीआर ची रुपरेषा सांगून सर्व वरील समाजांनी सदर आंदोलनास सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर मुख्य मार्गदर्शक सचिन राजूरकर यांनी 27/12/23 व 26/1/24 शासन निर्णय व अध्यादेश उपस्थित सर्व समाज बांधवांना कसा अन्यायकारक आहे याची संपूर्ण माहिती दिली तसेच इतर समाज मान्यवरांनी सभेला संबोधित केले.

.         सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वरील शासन निर्णय व अध्यादेश ची माहिती देवून वरोरा क्षेत्रातून जास्तीत जास्त संख्येने सदर मोर्चास सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक टिपले व आभार प्रदर्शन राजू हिवंज यांनी केले. या सभेत बहुजन समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!