महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सारिपुत्त धोटे यांचा सत्कार

29

वरोरा : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत 27 वी रॅकमध्ये उत्तीर्ण झालेल्या वरोरा येथील सारिपुत्त मानिक धोटे या विद्यार्थ्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

.        सारिपुत्त धोटे यांचे वडील मानिक धोटे हे नंदोरी येथे पशु वैद्यकीय अधिकारी आहेत. तर आई शिला धोटे या अंगणवाडी सेविका आहे. सारिपुत्त यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेत 27 वी रॅकमध्ये उत्तीर्ण झाला. त्याचे ध्येय तहसिलदार बनण्याचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आई वडिलांला दिले असून त्यांच्या अशाचा सत्कार वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य कुशल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

.        या सत्कार सोहळ्यात कविता गौरकर, रमेश टिपले, कपुरदास दुपारे, शंकर भेले, किसन वाघमारे, माजी नगरसेवक राहुल चौधरी सह आदींची उपस्थिती होती.