Home चंद्रपुर जिल्हा विशेष बोर्डा ग्रामपंचायत सरपंच ऐश्वर्या खामनकर अखेर पायउतार

बोर्डा ग्रामपंचायत सरपंच ऐश्वर्या खामनकर अखेर पायउतार

1435
  • दहा विरुद्ध दोन मतांनी ठराव पारित
  • तालुका महिला कोंग्रेस पदाचा दिला राजीनामा 

वरोरा :  शहरालगतच्या बोर्डा ग्रामपंचायत मध्ये आज मंगळवार दि १६ जानेवारी रोजी अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान करिता घेण्यात आलेल्या सभेत सरपंच ऐश्वर्या खामनकर यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित करण्यात आला. १३ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये १० विरुद्ध २ अशा फरकांनी हा ठराव पारित झाला. या सभेला एक सदस्य अनुपस्थित होते.
.        वरोरा तालुक्यातील शहरा लगत असलेली बोर्डा ही मोठी आणि श्रीमंत ‌ग्रामपंचायत समजली जाते. या ग्रामपंचायत मध्ये १३ सदस्य संख्या आहे. यापैकी १० सदस्यांनी १० जानेवारी रोजी सभेला विश्वासात न घेणे शासकीय आर्थिक व्यवहारांना व नियोजनाला विलंब करणे तसेच ग्रामपंचायत विकास कामात अडथळा निर्माण करणे असे आरोप करीतवरोरा तहसीलदारांकडे सरपंच ऐश्वर्या खामकर यांचे विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासंदर्भात नोटीस दिली. यावर कार्यवाही करताना वरोरा तहसीलदारांनी दि १० जानेवारी २०२४ रोजीच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५(२) नुसार अविश्वास प्रस्तावावर चर्चा व मतदान करण्याकरिता ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना १६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सभा घेण्यात येत असल्याची नोटीस ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांना बजावली. त्यानुसार आज दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत बोर्डा येथे अविश्वास प्रस्तावावर सभा पार पडली. या सभेत सरपंच ऐश्वर्या खामनकर यांच्या विरोधात दहा विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव पारित झाला. तहसीलदार कौटकर आणि ग्रामपंचायत चे सचिव सुभाष ताजने यांनी सभेची कार्यवाही पार पाडली . सरपंच खामनकर पायउतार झाल्यानंतर नवीन सरपंच निवडी पर्यंत उपसरपंच राहुल ठेंगणे यांच्याकडे सरपंच पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.यावेळी वरोरा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी स्वतःच्या उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.

error: Content is protected !!