राधिका दोरखंडेची निवड

30

राजुरा 

.         नेहरू युवा केंद्र संघटनेच्या वतीने 27 वी नॅशनल युथ फेस्टिवल राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे संपन्न होत असून त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील तीन वॉलेटर्सची निवड झालेली आहे. यामध्ये शिवाजी महाविद्यालय राजुराची विद्यार्थिनी राधिका दोरखंडे , निखिल भडके व साहिल सोनवणे यांची निवड झाली आहे.

.         सदर या शिबिरात देशभरातून जवळपास सात हजार विद्यार्थी सहभागी होणार आहे‌. नेहरू युवा केंद्र भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे कार्य करीत आहे. युवा दिनाच्या निमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरातून युवकांना मार्गदर्शन मिळणार असून युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी हे शिबिर प्रेरणादायी ठरणार आहे. शिबिरात सहभागी झाले याबद्दल संस्थेचे सचिव अविनाश जाधव,प्राचार्य डा.एस एम.वरकड, उप प्राचार्य डा..राजेश खेरानी,प्रा.बी.यू. बोर्डेवार,अविनाश दोरखंडे ,बादल बेले,प्रा.सुयोग साळवे यांनी कौतुक केले आहे.