Home राजकीय आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते शिवसेना (उबाठा) दिनदर्शिकेचे लोकार्पण

आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते शिवसेना (उबाठा) दिनदर्शिकेचे लोकार्पण

1526

जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोर-भद्रावती विधानसभेत शिवसेनेचे जनसंपर्क अभियान

वरोरा

. शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात   वरोरा – भद्रावती विधानसभेत  जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. यामध्ये पक्षाच्या कामाचा आढावा दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी पोहचविण्यात येणार आहे. या दिनदर्शिकेचे लोकार्पण शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव व खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव व जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा – भद्रावती विधानसभेत शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणानुसार अनेक समाजउपयोगी कार्य राबविल्यात जात आहे. यामध्ये अपंगांना ३ चाकी सायकल वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, रुग्णांना आरोग्यविषयक मदत,गावागावात आरोग्य शिबीर राबविणे व आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे  तसेच औदयोगिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी  लढण्याचे काम  जिल्हाप्रमुख  मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. पक्षाच्या वतीने केलेल्या या सर्व कामाचा आढावा जनसंपर्क अभियान राबवून दिनदर्शिकेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार आहे. या दिनदर्शकीचे लोकार्पण शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क नेते तथा आमदार भास्कर जाधव व खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

. यावेळी युवासेना माजी जिल्हाप्रमुख मनीष जेठानी, उपजिल्हा प्रमुख अमीत निब्रड, शहर प्रमुख संदीप मेश्राम, शिवदुत बंडू डाखरे, माजी उपजिल्हा प्रमुख वसंता मानकर, नागेंद्र चटपल्लीवार, बाळा क्षीरसागर, माजी नगरसेवक दिनेश यादव, महेश जिवतोडे, निखिल मांडवकर, जितेंद्र गुलानी, अरविंद खोबरे व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

error: Content is protected !!