कोठारी
. ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियान कोठारी येथील फुले-आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाच्या प्रांगणात शनिवारी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत संपन्न झाला.
. केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम मुद्रा लोन्स, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, पीएम आवास योजना, अटल मिशन फॉर रिज्युवनेशन (अमृत), पीएम भारतीय जन औषधी योजना, उजाला योजना, सौभाग्य योजना, आधारकार्ड अपग्रेडेशन तसेच ग्रामीण जनतेशी निगडीत आयुष्यमान भारत, पीएम स्वनिधी, स्वच्छ भारत मिशन, पीएम ई-बस सेवा, डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, खेलो इंडिया इ. विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली. यासाठी शासनाकडील डिजिटल स्क्रीन असलेली सुसज्ज व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती.
. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. या माध्यमातून विविध योजनांची प्रत्यक्ष माहिती दिली जात आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी, लाभार्थ्यांनी या अभियानात सहभाग झाले होते. या अभियानाच्या माध्यमातून आत्मनिर्भतेचा संदेश देण्यात आला.याप्रसंगी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच आयुष्यमान भारत लाभार्थ्यांना कार्डाचे वितरण करण्यात आले.प्रांगणात बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी विविध स्टॉल लावण्यात आले होते.तसेच उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
. या कार्यक्रमात कोठारीच्या सरपंच अश्विनी वासमवार, उपसरपंच सुनील फरकडे, पंचायत समितीचे संवर्ग अधिकारी धनंजय साळवे, बल्लारपूर पंचायत समिती माजी उपसभापती सोमेश्वर पदमगिरीवार, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्राम विकास अधिकारी अजय धवने, ग्राम पंचायत सदस्य, ग्राम रोजगार सेवक आकाश रायपूरे, ग्राम पंचायतीचे वरिष्ठ लिपिक सुरेश कंदकट्टीवार, अशोक लाटेलवार, सुरज कंदकट्टीवार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्व शिक्षक, वन विभागाचे कर्मचारी व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय धवने यांनी केले.


