Home चंद्रपुर जिल्हा विशेष चिमुरात ८ लाख ७७ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

चिमुरात ८ लाख ७७ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

1491

व्यापारी अटकेत : अन्न व औषधी आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई

चिमूर 

.          आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या सुगंधित तंबाखूवर शासनाने प्रतिबंध लावला आहे. असे असतानाही शहरात त्याची विक्री केली जात असल्याने अन्न व औषध विभागाच्या अधिकारी व पोलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारी धाड टाकून कारमधून ८ लाख ७७ हजार २९० रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणी एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली.विलास दौलत चंदनखेडे (५१, रा. चिमूर) असे आरोपीचे नाव आहे.

.          चिमूर शहरात सुगंधित तंबाखू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती फिर्यादी नागपुरातील गिरीश त्र्यंबकराव सातकर व अन्न सुरक्षा अधिकारी आर. बी. यादव यांना मिळाली. त्यांनी पोलिसांच्या मदतीने दुपारी १२:३० वाजता साईनगर येथे छापा मारला आणि उभे असलेल्या एमएच २७ बीएक्स ४६१० क्रमांकाच्या कारचीतपासणी केली. त्यावेळी कारमध्ये ८ लाख ७७ हजार २९० रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला.

.          पोलिसांनी विलास दौलत चंदनखेडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२८, १८८, २७३ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई अन्न व औषध सुरक्षा अधिकारी व पोलिस निरीक्षक मनोज गभणे, साहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश चवरे, शंकर बोरसरे, अमोल नन्नावरे आदींच्या पथकाने केली.

error: Content is protected !!