Home चंद्रपुर जिल्हा विशेष अर्धवट महामार्गाची मागणी घेऊन शेगावकर उतरले रस्त्यावर

अर्धवट महामार्गाची मागणी घेऊन शेगावकर उतरले रस्त्यावर

1532
  • दोन तास वाहतूक रोखून धरली
  • उपविभागीय अभियंता च्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

शेगाव

. वरोरा ते चिमूर महामार्गाचे बांधकाम मागील सात वर्षांपासून सुरू आहे. मात्र अद्यापही या कामाला पूर्णविराम मिळाला नाही. या अर्धवट महामार्गामुळे दररोज अपघात घडत असतानाही याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने अखेर शेगावकरांचा संयम सुटला. आणि व्यापारी व गावकरी एकवटत तब्बल दोन तास अरोरा चिमूर महामार्ग रोखून धरला. राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता बोबडे यांच्या लेखी आश्वासनानंतर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.

लेखी आश्वासन देतांना उपविभागीय अभियंता बोबडे, व पोलीस निरीक्षक मेश्राम 

वरोरा चिमूर महामार्गा वरील शेगाव बु येथे बुधवारी दि. १३ डिसेंबर ला सकाळी १० वाजता बसस्थानका जवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला. शेगाव गावकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद करून आंदोलनात सहभाग नोंदविला होता. तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरल्याने वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटले की, या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे कित्तेकांना आपला जिव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले असून मागील २ महिन्या पासून रस्त्याचे काम करणाऱ्या एस. आर. के. कंपनी चे पूर्ण काम बंद केले आहे. त्यामुळे स्थानिक जनतेला, प्रवाशांना, ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे याच्या विरोधात हे आंदोलन शेगाव मधील नागरिक आणि परिसरातील त्रस्त नागरिक यांनी आयोजित केले होते. सुमारे २ तास वाहतूक ठप्प झाली होती आंदोलन पूर्ण होत पर्यंत शेगाव मधील संपूर्ण व्यापारी मंडळींनी स्वयंस्पुर्तीने आपली दुकानें बंद ठेऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. नंतर स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांचे माध्यस्थीने राष्ट्रीय माहामार्ग चे उपविभागीय अभियंता बोबडे यांचे लेखी आश्वाषणा नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यात अभियंता बोबडे यांनी येत्या आठ दिवसात रस्त्याच्या कामावर नवीन कंपनीची नियुक्ती करुन पावसाळा सुरु होण्या अगोदरच संपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल. असे लेखी आश्वासन दिले. तर शेगाव मध्ये उडणाऱ्या धुळी साठी रोज रस्त्यावर पाणी मारण्यात येईल.व भेंडाला जवळ रस्त्याच्या मधात गरज नसताना उभी असलेली मशीन लवकरात लवकर रस्त्याच्या बाजूला हटवण्यात येईल अशा स्वरूपाचे लेखी आश्वासन दिले.

.           या आंदोलनात शेगाव येथील नागरिक, परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

error: Content is protected !!