Home राजकीय निखिल मांडवकर यांची युवासेनेच्या विधानसभा समन्वयक पदी नियुक्ती

निखिल मांडवकर यांची युवासेनेच्या विधानसभा समन्वयक पदी नियुक्ती

1275

 जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे व युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठानी यांनी केले अभिनंदन 

वरोरा 

.         येथील सामाजिक कार्यकर्ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व गोर गरीब जनतेच्या हाकेला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते यांची युवासेनेतील कामगिरी बघता युवासेनेच्या वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख पदी वर्णी लागली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे व युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठाणी यांनी अभिनंदन केले.

.         शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे.यामध्ये युवासेनेत सक्रियरित्या कार्य करणारे धडाडीचे कार्यकर्ते निखिल चिंतामणी मांडवकर यांची वरोरा – भद्रावती विधानसभा समन्वयक पदी वर्णी लागली आहे. त्यांनी कोरोना काळात अनेक गोरगरिबांसाठी अन्नदान अभियान सुद्धा राबविले आहे. तसेच ग्रामीण विद्यार्थांना बससेवेत झालेल्या अडचणीसाठी अनेकदा पुढाकार घेऊन समस्या सोडविल्या आहे. तसेच शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या वीज समस्येविषयी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचे काम सुद्धा यांच्या वतीने करण्यात आले. तसेच रस्त्यासंबंधित उद्भवणाऱ्या समस्या व अश्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन समस्या मार्गी लावला तसेच पक्ष वाढीसाठी अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश सुद्धा मांडवकर यांच्या माध्यमातून करण्यात आला. त्यांच्या नियुक्तीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे व युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठाणी यांनी अभिनंदन केले. युवासेना जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव, जेष्ठ शिवसैनिक चिंतामणी मांडवकर व आदी शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!